वाई ! तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी १७ जागांसाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अखेरच्या दिवशी १७ जागांसाठी १८ अर्ज आले. ब वर्ग व्यक्ती सभासद मध्ये तीन जागांसाठी चार  अर्ज आले आहेत.हा  मतदार संघ वगळता बाकी सर्व ठिकाणी जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
      निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक जी टी खामकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कोरडे काम करीत आहेत. आज सकाळी ११ वाजता सहाय्यक निबंधक कार्यालयात अर्जाची छाननी होणार आहे. दिनांक११ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत सकाळी अकरा ते तीन पर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत असून २६ एप्रिलला चिन्ह वाटप होणार आहे .गरज पडल्यास १० मे ला निवडणूक होण्याची शक्यता आहे. 
          अ वर्ग सहकारी संस्था मतदारसंघात नऊ जागा असून नऊच अर्ज आले आहेत .शिवाजीराव पिसाळ (व्याजवाडी )मदन आप्पा भोसले (बावधन) रामदास इथापे (देगाव )अंकुश कांगडे ( वेळे) शंकरराव शिंदे( पांडेवाडी) विठ्ठल फरांदे ( उडतारे) सुनील संकपाळ (चांदक ) दिलीप वाडकर (वयगाव )रामदास पोळ ( धोम ) ब वर्ग व्यक्ती सभासद मतदार संघात ३ जागा साठी ४ अर्ज आले आहेत. बाजीराव महांगडे( पसरणी )सुरजित जाधवराव (भुईंज ) आनंद चिरगुटे (मुगाव) अमोल कदम (केंजळ ) महिला राखीव मध्ये दोन जागासाठी दोनच अर्ज आले आहेत. सौ आशा दत्तात्रय मर्ढेकर ( वाई ) सौ हेमलता रवींद्र जाधव (पाचवड) ओबीसी राखीव एका जागेसाठी एकच विठ्ठलराव शिंदे( बोपेगाव ) यांचा अर्ज आला आहे.
        विशेष मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती मध्ये एका जागेसाठी एकच  सुनील खरात  (सिद्धानाथ्वादी वाई ) यांचा अर्ज आला आहे. अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी संजय कांबळे (खडकी) यांचा एकच अर्ज आला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची निवड आमदार मकरंद पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रांतिकचे सचिव प्रतापराव पवार ,वाई सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी उपसभापती महादेव मस्कर , माझी नगराध्यक्ष रमेश गायकवाड आदींनी केली असून बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
       फोटो खालील ओळी -- जी टी खामकर यांचेकडे सर्व अर्ज देताना प्रतापराव पवार, महादेव मस्कर, शिवाजी पिसाळ शेजारी मदनआप्पा भोसले,चरण गायकवाड,रविंद्र जाधव,  शंकरराव शिंदे, सुनिल संकपाळ व इतर.
To Top