सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
पुणे सातारा महामार्गा वरुन सातारच्या दिशेने भरघाव वेगात येणार्या सातारा पोलिस दलातील शासकीय वाहन असलेले पोलिस व्हॅन हि गुरुवार दि.७ रोजी ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु .एम.ओ.कंपनीच्या समोर आली.
त्यावेळी चालक असलेले पोलिस हवलदार शिंदे यांचा वेगावरील ताबा सुटल्याने व्हॅन महामार्गाच्या दुभाजकाला जावुन धडकुन झालेल्या भिषण अपघातात पोलिस व्हॅनच्या पुढील बाजुच्या सर्व काचा फुटल्याने महामार्गावर काचांचा खच पडला होता तर पोलिस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. या झालेल्या भिषण अपघातात व्हॅनवर चालक असलेले शिंदे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णवाहिका व्दारे पुणे येथील श्र्लोक हॉस्पिटल मध्ये ऊपचारा साठी दाखल केले आहे तर व्हॅन मध्ये असणारे सहाय्यक फौजदार महाघरे पोलिस कॉस्टेबल बक्कल नं.७०९ नलवडे हे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत . घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की सातारा पोलिस दलातील वाहन क्रमांक एम.एच.११ ऐ.बी.८२४५ ही पोलिस व्हॅनचे चालक असलेले पोलिस हवलदार शिंदे हे सहाय्यक फौजदार महाघरे पोलिस कॉस्टेबल नलवडे असे तिघेजण शासकीय कामासाठी पुणे येथे गेले होते .तेथील कामकाज ऊरकुन हे तिघेही पोलिस व्हॅन मधुन पुन्हा गुरुवार दि. ७ रोजी दुपारच्या वेळेस पुन्हा पुणे सातारा महामार्गावरुन सातार्याच्या दिशेने भरघाव वेगात येत असताना त्यांची पोलिस व्हॅन महामार्गा वरील ससेवाडी गावच्या हद्दीतील डल्बु.एम.ओ.कंपनी समोर आली त्या वेळी चालक असलेले शिंदे यांचा वेगावरील ताबा सुटल्याने व्हॅन महामार्गावरील डिवाडरला जाऊन धडकुन झालेल्या भिषण अपघातात
पोलिस व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या अपघाताची नोंद शिंदेवाडी पोलिस चौकीत झाली आहे .