सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार पुणे विभागाच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड,बारामती आणि पुरंदर तालुक्यातील रेल्वेच्या चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदार संघाचे समनवयक प्रवीण शिंदे यांनी दिली .
पुरंदर तालुक्यातील आंबळे,पारगाव,कोथळे,जेजुरी रेल्वे स्टेशन समोरील उखडलेला रस्ता वाल्हे गावातील अंडरपास च्या कामाची चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नीरा येथे रेल्वे क्वारटर्स निकृष्ट कामाच्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली. बारामती,दौंड विद्युतीकरणाचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला.त्याच दौंड तालुक्यातील चालू असलेल्या अंडरपासची चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी सेंट्रल रेल्वे चे सदस्य प्रवीण शिंदे जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे ,अशोक गायकवाड ,वसंत गायकवाड ,रवी गायकवाड उपस्थित होत