सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई सुरूर रस्त्यावर शेंदुरजणे ता. वाई गावच्या हद्दीत असणार्या मॅप्रो कंपनीत शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ३ कामगारांनी एकत्र येऊन लोखंडी पाईप आणी दांडक्याच्या साह्याने सहकारी कामगार असलेला भानुदास मारुती शेंडे वय ३५ राहणार पारडी ठवरे ता.नागभीड जिल्हा चंद्रपुर या तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने कंपनीत खळबळ उडाली आहे .
या निघृण हत्येची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास समजताच त्यांनी तातडीने सपोनि रविंद्र तेलतुमडे महिला पिएसआय एस.टी सोमदे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने कॉस्टेबल किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर हवलदार शिवाजी वायदंडे मदन
वरखडे अजीत जाधव सुजाता मोकाशी रामदास पवार शांताराम शेलार असा पोलिस फौज फाटा घेऊन घटना स्थळावर दाखल होऊन या गंभीर घटनेची सविस्तर माहिती घेऊन घटना स्थळाची पाहणी करुन मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करून तो शवविच्छेदना साठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला . ज्या ३ कामगारांनी एकत्र येऊन मारहाण केली त्या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दारूच्या नशेत असणाऱ्या सहकारी मित्राचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली .असल्याने तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे,
वाई पोलिस ठाणे व घटना स्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार शेंदुरजणे येथील मॅप्रो कंपनीच्या आवारात शेंदुरजणे डोंगरावर जाणाऱ्या कच्चा रोडवर शेंदुरजणे गट नंबर ११० वर कामगार भानुदास मारुती शेंडे (३५) मूळ राहणार पारडीठवरे ता.नागभीड जि.चंद्रपूर याचा खून
झाल्याची घटना दि.९ रोजी घडली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात कंपनीचे सिक्युरिटी गार्ड शंकर यादव वय वर्षे २४ यांनी दिली. मयत भानुदास मारुती शेंडे हा गेल्या एक महिन्या पासुन तो मॅप्रो कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्या मुळे तो रोज दारू पिऊन सहकाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडण
करणे अशा गोष्टी करायचा. यातच शुक्रवार दि.८ रोजी कामा वरून सुटल्या नंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास भानुदास शेंडे हा दारू पिऊन आल्याने नेहमी प्रमाणे त्याच्या बरोबर एकत्रित राहण्यास असणारे त्याचे सहकारी १)मनोज संगेल रा.तोलोदि ता.नागभीड जि. चंद्रपूर २)प्रफुल्ल चेन्नकार
रा.तोलोदि ता.नागभीड जि. चंद्रपूर ३) जितेंद्र नेवारे रा. नावेगावहूंडेश्वरी ता.नागभीड जि. चंद्रपूर यांच्याशी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून वरील तिघांनी मयत भानुदास शेंडे याला लाकडी दांडके, लोखंडी पाइप व पायातील बुटांनी मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.
तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब कंपनीचे सिक्युरिटी गार्ड शंकर अनिल यादव यांच्या सकाळी निदर्शनास आल्यावर
त्यांनी कंपनी व्यवस्था पनाशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आलेली घटना सांगितली. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेले ऋषीकेष मापारी यांनी तात्काळ या गंभीर घटनेची माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना कळवले होते त्या मुळे झालेल्या खुणाचा ऊलगडा झाला. या घटनेचा अधिक तपास पो.नि. बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र तेलतुंबडे करित आहेत.