बारामती ! निंबूतच्या प्रसिद्ध बैलगाडी मैदानात साखरे बंधूंची बैलगाडी प्रथम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत (ता. बारामती) येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवलेल्या बैलगाडा शर्यतीत मुरूम येथील महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील दीपक साखरे व जीवन जगताप यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. निंबुतच्या शर्यती आणि कुस्त्या राज्यात प्रसिध्द आहेत. येथील शर्यतीत नामांकित मैदानात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ८५ बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. निरा - मोरगाव रस्त्यावर गुळुंचे गावालगत मंगळवारी(दि.२६) रोजी बैलगाड्यांचा थरार पहायला मिळाला. यामध्ये १९ गट झाले व सेमीफायनलच्या ६ गट झाले. यातून फायनलच्या गाड्यांची निवड करण्यात आली. शर्यतीमध्ये श्री महालक्ष्मी प्रसन्न उद्योजक स्वप्नील दीपक साखरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.  

          सार्थक बाबाराजे जगताप सासवड - राजमुद्रा ग्रूप वाघळवाडी द्वितीय, आदित्यभैय्या येळे- पाडेगाव तृतीय, चंद्रशेखर वामनराव काकडे-अरविंद धनावडे- पुणे व अनुजा नितीन शेवाळे हडपसर चतुर्थ, जय हनुमान प्रसन्न- आयाजभाई सय्यद निरा व पै. विठ्ठल विनोदे पाचवा आणि काळभैरवनाथ तरडोली यांनी सहवा क्रमांक पटकावला. विजेत्या प्रथम क्रमांकास ७१ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार, तृतीय क्रमांकासाठी ४१ हजार, चतुर्थ क्रमांकासाठी ३१हजार, पाचव्या क्रमांकासाठी २१ हजार आणि सहाव्या क्रमांकासाठी ११ हजार रोख बक्षीस देण्यात आहे. भैरवनाथ यात्रा कमिटी निंबूत व समस्थ ग्रामस्थांच्यावतीने बैलगाडा शर्यतींचे चोख नियोजन करण्यात आले होते. विजयानंतर बैलगाडी चालक- मालक यांनी फटाके फोडत, गुलालाची उधळण करत, वाद्यांच्या तालावर नाच करत जल्लोष केला. 

To Top