सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राजगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड आनंदनगर निगडे ता.भोर संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २०२२ हा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्याच दिवशी भटक्या विमुक्त विशेष मागास प्रवर्ग गटातून राजगडचे माजी संचालक चंद्रकांत रामचंद्र सागळे यांचा अर्ज दाखल केला आहे. तर ३ उमेदवार अर्ज घेऊन गेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
२०२२ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे भोर तालुक्यात राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. १७ संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सहा गटासाठी १७ जागांवर निवडणूक होणार आहे. या जाहीर निवडणूक कार्यक्रमांमुळे राजकारणाच्या भुवया उंचावल्या असून राजकीय आखाड्यात याचे पडसाद कसे उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.