उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार माळी समाजाचा भव्य मेळावा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोलापूर : प्रतिनिधी
संतशिरोमणी सावता महाराज यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र अरण (जि. सोलापुर) येथे दि. ३० एप्रिल २०२२ रोजी दु. १२.३० वा. सावता परिषदेच्या वतीने माळी समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मुख्यअतिथी म्हणुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती रहाणार असल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
          सन २०११ पासून दरवर्षी होणारा राज्यस्तरीय माळी समाज मेळावा आता एकप्रकारे परंपरेचा मेळावा होत असुन या मेळाव्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजयराव मुंडे, सोलापूरचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. रुपालीताई चाकणकर यांच्यासह खा. अमोल कोल्हे, माजी राज्यमंत्री आ. अतुल सावे, आ. जयकुमार गोरे, आ. मनीषाताई चौधरी, आ. देवयानीताई फरांदे, आ. प्रज्ञाताई सातव, आ. बबनराव शिंदे, आ. सतिष
चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडित, आ. संदिप क्षीरसागर, आ. प्रणितीताई शिंदे, आ. यशवंत माने, आ. संजय शिंदे, आ. शहाजी पाटील, रंजनभाऊ गिरमे, नामदेवदेवा राऊत, शंकरराव बोरकर, संभाजीराजे शिंदे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी श्रीक्षेत्र अरणच्या विकासाचे भवितव्य ठरविणारा माळी समाजाचा हा भव्य मेळावा खऱ्या अर्थाने भव्य व्हावा यासाठी राज्यभरातील माळी समाज बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे व माळी समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन घडवावे असे अवाहन मेळाव्याचे संयोजक कल्याण अखाडे यांनी केले आहे.
To Top