सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती मिळताच वडगाव ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरून आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला,.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानण्यासाठी छोटेखानी सभा पार पडली यासाठी सोमेश्वर चे संचालक शिवाजी राजे निंबाळकर सरपंच सुनील ढोले माजी संचालक अनिल कुमार शहा सदस्य राहुल आगम, मोहन हिरवे, संतोष दरेकर, सारिका खोमणे अश्विनी खोमणे स्वाती हिरवे, राजश्री साळवे, लता परांडे, मारुती पानसरे,जितेंद्र पवार, सुनील माने, बापूराव दरेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत यापुढे याला गती मिळेल पाणी पुरवठा योजना ही ऐतिहासिक कामगिरी आहे यामुळे याचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले अशी प्रतिक्रिया सरपंच सुनील ढोले यांनी व्यक्त केली शिवाजी राजे निंबाळकर म्हणाले की विकास कामे दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्नशील राहुयात पवार कुटुंबियांच्या मदतीने निधी येतो याचा योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजेत यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आपण पार पाडू असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला