एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून बारामतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगावमधील गोविंदबाग निवासस्थानासमोर ही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे .
मुंबईतील सिल्व्हर ओक या जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आज अनपेक्षितपणे आंदोलन करून दगडफेक,चप्पलफेक हल्ला. खबरदारी म्हणून या निवास्थानासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.