वाई ! भुईंज पोलिसांच्या कारवाईत खून आणि मोक्यातील आरोपी गजाआड : सातारा न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ .
भुईंज येथील ऊद्योजक ओंकार कैलास चव्हाण 
वय ३२ याचे दि.४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ४ |३० वाजण्याच्या सुमारास प्रख्यात गुंड बंटी जाधव सह  तब्बल १२ जनांनी  अपहरण करून निर्जण स्थळावर नेहुन त्याला अमानुष पणे मारहाण करुन त्याचा खुण केला होता    पुढे या डोळीने भुईंज येथील स्मशानभूमीत मयत ओंकारचा मृतदेह आणुन पोलिसांना  पुरावा सापडू नये म्हणून 
तो मृतदेह भुईंज येथील स्मशानभूमीत त्याच रात्री दिड वाजण्याच्या सुमारास जाळुन टाकुन त्याची राख लगतच असणार्या कृष्णा नदीत टाकुन या टोळीने पुरावाच नष्ट केला होता .
           या मर्डर मधील १० आरोपींना सातारा एलसीबी आणी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे व त्यांच्या टिमने या आधीच गजाआड करुन सर्व आरोपींना मोका लावला आहे पण यातील आरोपी असलेला काश्या कचरे आणी मिथुन घाडगे हे दोन्ही आरोपी भुईंज पोलिसांना सापडत नव्हते पण दि.२१  रोजी काश्या कचरे हा रात्री भुईंज परिसरात येणार असल्याची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी त्या परिसरात आपल्या सहकार्याना घेऊन सापळा लावुन बसले असता  या सापळ्यात मध्य रात्री काश्या कचरे हा अडकल्याने भुईंज पोलिसांन मध्ये समाधानाचे
वातावरण पसरले आहे.
To Top