सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील वाणेवाडी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरसिंग लक्ष्मणराव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा रोहिणी पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक जगताप राजेंद्र संपतराव, जेधे शशिकांत विलासराव, जगताप बाबुराव जर्नादन, जगताप अमरसिंह बुवासो, नांदखिले सुरसिंग दिनकरराव
जगताप रोहिणी पुरूषोत्तम, कोंडे विमल चंद्रकांत, पवार अनिल बबन, चव्हाण भानुदास आबा आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम टी पाटणे यांनी काम पाहिले. त्यांना सचिव राजेंद्र जगताप व गणेश जगताप यांनी सहकार्य केले.
COMMENTS