सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या संस्था , व व्यक्ती यांना गेली पंचवीस वर्षापासून कै. दिनकरराव सावंत स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार दिले जातात. पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे तसेच पिंपरी _चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व ह. भ. प. आनंद तांबे यांना यंदाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत यांनी सांगितले .
पत्रकारितेतून विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय मिळवून देणारे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे,. त्तसेच पिंपरी _चिंचवड देवस्थानचे विश्वस्त व ह. भ. प. आनंद तांबे यांनी आपल्या किर्तनातून अनेक वर्षापासून केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झालेले असून या पुरस्काराचा वितरण समारंभ पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते होणार आहे
. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुणे जिल्ह्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर , पदाधिकारी रविंद्र जोशी , डॉ सुमित काकडे,व नितीन राऊत ,संजय सावंत, प्रल्हाद गिरमे यावेळी उपस्थित होते .