सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.या बेरोजगारीच्या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष घालून तालुक्यात औद्योगिक वसाहत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.लवकरच तालुक्यात उत्रोली व भोरेश्वर औद्योगिक वसाहत स्थापन होणार असून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याने शहरातील बाजार पेठेत मोठी उलाढाल होण्यास सुरूवात होईल.बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढून बाजारपेठेचा लवकरच काया पालट होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर शहरात रामबाग येथे स्विमिंग पुल ३ कोटी ५० लाख, स्मशानभूमी सुशोभिकरण १ कोटी ५०लाख , मंगळवार पेठेत लोकमान्य टिळक व्यापारी संकुल ४ कोटी ५० लाख अशा एकूण ९ कोटी ५० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन सोमवार दि-११ आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी भोर शहर काँग्रेस अध्यक्षपदी गजानन दानवले यांची निवड करण्यात आली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे , महिलाध्यक्षा गिताजंली शेटे , राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपाताई थोपटे ,उपसभापती रोहन बाठे ,बाजार समिती सभापती अकुंश खंडाळे , नगराध्यक्षा निर्मला आवारे ,उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर ,गटनेते सचिन हर्णसकर ,नगरसेवक अमित सागळे ,गणेश पवार, सुमंत शेटे ,समीर सागळे , देविदास गायकवाड,नगरसेविका रुपाली कांबळे,तृप्ती किरवे,सोनम मोहिते, तानाजी तारु, रमेश ओसवाल , काँन्ट्राक्टर बाळासाहेब ठाकर ,शहरातील आजी - माजी पदाधिकारी उपस्थित होते.
थोपटे पुढे म्हणाले भोर शहरातील तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी धरण तसेच नदी-नाल्यावर जात असतात .यामुळे अनुसुचीत प्रकार घडत आहे. मात्र लवकरच भोर नगरपालिकेच्या हक्काच्या जागेत स्विमिंग टँग होणार असल्यामुळे तरुणासह महिलांना ही यांचा उपयोग होणार असल्याने पुढील काळात होणारे अनुचित प्रकार थांबतील. कार्यक्रमाचे सूञसंचालन संजय देवकर ,प्रास्ताविक चंद्रकांत मळेकर यांनी केले.