सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारतीय नागरिक आपल्या हक्काबाबत जागरूक आहेत मात्र कर्तव्येबाबत जागरूक नाहीत. भारत देश जर महासत्ता बनवयाचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे मत डॉ राजकुमार रिकामे यांनी व्यक्त केले.
बारामती ता. बारामती येथे मु .सा. काकडे महाविद्यालयात दि. १३ रोजी महाविद्यालयाच्या IQAC च्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे हक्क,कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर जेजुरी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजकुमार रिकामे यांनी भारतीय राज्यघटनेत मुलभुत हक्क आणि कर्तव्य या विषयावर विशेष व्याख्यान झाले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे संस्थेचे सह सचिव सतीश लकडे ,उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे ,डॉ जया कदम ,डॉ प्रवीण ताटे देशमुख, प्रा.रजनीकांत गायकवाड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नारायण राजूरवार यांनी केले तर आभार डॉ निलेश आढाव यांनी केले.