सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : प्रतिनिधी
भोर नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभारा विषयी भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमरण उपोषण मंगळवार दि-१२ करण्यात आले होते.उपोषण कर्त्यांना १ महिन्यात संबंधितांवर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आठ तासानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
भोर नगर परिषदेच्या समोर मंगळवार दि. १२ रोजी भ्रष्ट कारभार करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष सुहित जाधव व राजेश शिंदे यांचे आमरण उपोषण सुरु केले होते. यामध्ये आमराई आळी मधील नगरपालिका मीटर मधून लाईट चोरून नगरपालिका विहीर मधून पाणी चोरी ,नगरपालिका गाळे मधील झालेल्या भ्रष्ट कारभार , नगरपालिका हद्दिमधील बेकायदेशीर वृक्ष तोड, अनाधिकृत बांधकामे ,निकृष्ट दर्जाचे कामे अशा भ्रष्ट कारभारा विषयी आमरण उपोषण सुरु केले होते.चंद्रकांत बाठे, रणजित शिवतरे , विठ्ठल शिंदे,गटनेते यशवंत डाळ,शहराध्यक्ष नितीन धारणे ,महिलाध्यक्ष हशिणा शेख, सौ.सुनीता बदक, युवराज जेधे,केदार देशपांडे, शिवसेना पक्षाचे आप्पा सोनावले,प्रहारचे अपंग संघटनेचे बापू कुडले यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला होता. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी यासाठी प्रशासकीय समिती स्थापन केलेली आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त होताच १ महिन्याच्या आत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.