सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बाबुर्डी येथील श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा शांततेत पार पडली शनिवारी सायंकाळी देवाचा लग्नसोहळा पार पडला तसेच सोमवारी शेरवाडी-बाबूर्डी येथील तरुण यूवक हे सोनारी (ता परांडा जिल्हा उस्मानाबाद)येथे मशाल ज्योत आणण्यासाठी गेले होते.
मंगळवारी ज्योत आल्यानंतर गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढून ज्योत मंदीरात नेऊन संध्याकाळी देवचा छबीना तसेच फटाक्यांची आतषबाजी करत पालखी मिरवणूक काढण्यात आली बुधवारी सकाळी दहा वाजता विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला पाच वाजता कुस्त्यांचा भव्य असा आखाडा पार पडला यामध्ये शेवटची मानाची कुस्ती 51000 हजार रूपयांची सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्या हस्ते लावण्यात आली संध्याकाळी परत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला तसेच गुरुवारी सायंकाळी गावातील सर्व तरुण यूवाकांच्या वतीने स्वरसंगम हा आॅर्केस्टा ठेवण्यात आला होता कोरोनामूळे दोन वर्षे यात्रेला खंड पडला होता त्यामुळे यंदा यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अशी माहिती यात्रा कमिटिचे अध्यक्ष हौशिराम पोमणे तसेच नानासो लडकत, शांताराम ढोपरे यांनी दिली ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोय सूविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या अशी माहिती सरपंच ज्ञानेश्वर पोमणे तसेच उपसरपंच अँड दिपाली जगताप यांनी दिली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच यात्रा कमिटीला देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामूळे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले असल्याची माहिती पोलिस पाटील वनिता लव्हे यांनी दिली तसेच यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा परिषद सदस्य भरतनाना खैरे यांच्या पाठपुराव्यामुळे संजिवनी ग्रूप बारामतीचे अध्यक्ष सचिन शाहीर यांच्या वतीने पिण्यासाठी फिल्टरचे पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आला होता.