सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) येथील नथुराम पाटीलबुवा गिते विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सिध्दार्थ उदयकुमार गिते यांची तर उपाध्यक्षपदी पंकज रामचंद्र निलाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहाय्यक निंबधक कार्यालय बारामती येथे या निवडी पार पडल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निंबधक मिलिंद टांकसाळे आणि सचिव सोनबा विश्वनाथ होळकर यांनी काम पाहिले. परीसरातील सर्वाधिक जूनी सोसायटी असून जवळपास ८०० सभासद आहेत. संचालकमंडळ पुढीलप्रमाणे : एकनाथ सोपान होळकर, मनोज दत्तात्रय होळकर, सागर तानाजी वायाळ, सुधाकर शिवाजी कांबळे, सिंधू मारुती होळकर, स्नेहा सिध्दार्थ गीते, राजेंद्र नारायण कदम, हिंदुराम शिवराम शिंदे, महेश नारायण कारंडे, प्रमोदकुमार नथुराम गीते, तानाजी तात्याबा वायाळ.