बारामती पश्चिम ! खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजित लकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अजित विलास लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
          सरपंच भाग्यश्री धनंजय गडदरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदी अजित लकडे यांनी निवड पार पडली. या ग्रामपंचायतची निवडणूक २०२१-२२ मध्ये पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरूस्कृत श्री सोमेश्वर जनशक्ती पॅनेल प्रमोद काकडे सभापती बांधकाम व आरोग्य समिती पुणे जिल्हा परिषद पुणे, लक्ष्मणराव गोफणे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वसंतराव मदने माजी व्हा चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, धनंजय गडदरे युवा नेते राष्टृवादी क्रॉग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखाली ५/२  ने विजयी झाली होती त्यावेळी ठरल्याप्रमाणे पाच सरपंच करण्यात येणार आहेत त्यावेळी प्रंथम सरपंच  भाग्यश्री धनंजय गडदरे यांची निवड करण्यात आली त्यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पंदासाठी  अजित विलास लकडे यांची बिनविरोध‌ निवड झाली. 
        निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रमिला संदीप लोखंडे मंडलअधिकारी वडगाव निबांळकर यांनी काम 
पाहिले त्यांना दादासाहेब आगम तलाठी खंडोबाचीवाडी,  सीमा नारायण गावडे ग्रामसेवीका ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी यांनी सहकार्य केले. यावेळी माजी सरपंच भाग्यश्री धनंजय गडदरे, संतोष उत्तम धायगुडे उपसरपंच श्रुती महेश मदने, मगंल‌ दिनकर ठोंबरे, वर्षाली सतीश कटरे  मनिषा विश्वास फंरादे ,धनंजय गडदरे युवा नेते, अतुल लकडे, सागर मदने,बापुराव लकडे नाना लकडे हे उपस्थिती होतो सरपंच निवड झाल्याबद्दल‌ प्रमोद काकडे, अभिजीत काकडे, लक्ष्मणराव गोफणे, वसंतराव मदने‌ यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. 
To Top