सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व खासदार शरद पवार त्यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती तालुक्यातील करंजेपुल उद्या दि १० रोजी १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी दिली.
सकाळी साडेनऊ वाजता करंजेपुल चौकात जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज राज्यभरात ठीक ठिकाणी या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली.