सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : adv. गणेश आळंदीकर
बारामती येथील यात्रेकरु दिल्लीवरुन नोएडा मार्गे पुढे जात असताना आज पहाटे बोलेरो जीप व हायवा डंपर चा भीषण अपघात झाला त्यात पाच यात्रेकरुंचा मृत्यु झाला असुन चार जण बारामतीतील असुन बारामतीतील दोघे गंभीर असुन पाचवा मयत कर्नाटकातील आहे .
नोएडा तील रुग्णालयात अपघात ग्रस्ताना उपचार चालु असुन मुळचे महाराष्ट्रातील असलेले पोलीस अधिक्षक बोराटे यानी मदत केली.मयतामधे बारामतीतील चंद्रकांत नारायण बुराडे ,सुवर्णा चंद्रकांत बुराडे ,रंजना भरत पवार ,मालन कुंभार हे असुन उर्वरीतावर उपचार चालु आहेत . याबाबत सोमेश्वर रिपोर्टर चे प्रतिनिधी ॲड गणेश आळंदीकर यानी अजितदादाचे स्वीय सहायक हनुमंत पाटील ,खासदार सुप्रिया सुळे यांचेशी संपर्क साधला असता अजितदादा सुप्रियाताई व शरद पवार साहेब हे सर्वजण उर्वरीत जखमीना उपचार करण्यासाठी सकाळपासून संपर्कात असुन एक तज्ञ डॉक्टरांची टीम नोएडा येथील हॉस्पीटल मधे उपचारासाठी पाठवण्यात आली असुन गंभीर जखमीना वाचवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत ,तसेच मयत व्यक्तिना देखील त्वरीत बारामती ला आणण्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना स्वीय सहायक हनुमंत पाटील व नितीन सातव यानी सांगीतले.