सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या व राजकीय दृष्ट्या तालुक्यातील महत्वाचे गांव म्हणून नावलौकिक असणाऱ्यां आनेवाड़ी विकास सोसायटी च्या झालेल्या अटीतटीच्या लढती मधे भैरवनाथ विकास पॅनलने एक हाती सत्ता मिळवित आपले सोसायटी वरील वर्चस्व कायम ठेवित विजय मिळविला.
प्रतापगड कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन राजेंद्र फरांदे यांच्या नेतृत्वा खालील भैरवनाथ विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा वर विजय मिळविला असून विरोधी भैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनल च्या अकरा उमेदवारांचा पराभव करीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांची एक हाती सत्ता स्थापन केली.प्रथम मारुति जाधव,व सिद्धार्थ जगताप या राखीव गटातील दोन जागा बिनविरोध करण्यात यश मिळविल्यानंतर निवडणूक लागलेल्या अकरा जागांवर भैरवनाथ विकास पॅनलचे कल्याण फरांदे,सुरेश फरांदे,संकेत फरांदे,साहेबराव फरांदे,विवेक पवार,मनेश फरांदे, रमेश फरांदे,रमेश भाऊ फरांदे,विजय फरांदे,महिला राखीव मधून सुनंदा फरांदे,जया फरांदे यांनी विजय मिळविला.
विजया नंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व वेदांतिकाराजे भोसले यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले,यावेळी पॅनल प्रमुख राजेंद्र फरांदे यांनी येणाऱ्या काळात संस्थेच्या प्रगती साठी सर्व शेतकरी सभासद याना सोबत घेत व सर्वाना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले,तसेच सर्व शेतकरी सभासद यांचे आभार व्यक्त केले.
भैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख माजी चेअरमन बबन फरांदे यांनी पॅनलच्या वतीने विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत संस्थेच्या पुढील वाटचाली मधे चांगल्या कार्यात आमचा देखील सहभाग असेल तसेच सर्वानी मिळून शेतकरी हिताचे निर्णय घेवून सर्व शेतकरी सभासद यांचे अधिकार कायम राहतील या कड़े लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्व मतदारांचे आभार मानले.