बारामती ! सिरम इन्स्टिट्यूटचा १ कोटी ३२ लाखाचा निधी..जोगवडी ते ढोलेमळा टाकली जाणार पुरंदर उपसाची नवीन पाईपलाईन....दोनशे शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव ता. बारामती येथील जोगवडी ते ढोलेमळापर्यंत  पुरंदर उपसा सिंचनची नव्याने पाईपलाईन टाकली जाणार आहे . या योजनेमुळे दोनशे शेतकऱ्यांना  लाभ होणार असुन  पाचशे  हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे येथील सिरम  इन्स्टिट्यूटने एक कोटी ३२ लाख रुपयांचा निधी दिला आहे . या कामाचा शुभारंभ सोमेश्वर सह. साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप आज दि १ रोजी केला .

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना वरदान ठरत आहे.  या योजनेमुळे पश्चिम  भागातील उजाड माळरानावरही उसाचे ताटवे पिकवण्यास सुरवात झाली आहे .मात्र तलाव व ओढ्यापर्यंत थेट बंदिस्त पाईपलाईन नसल्याने  पुरंदर उपसा सिंचनचे पाणी मोरगाव नजीक वाड्यावस्त्यावरील शेतकऱ्यांना मोकळ्या शेतातून पाणी आणावे लागत  असल्याने प्रत्यक्ष लाभ कमी व खर्च जास्त असे गणित होते . या भागातील अनेक दिवसांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुर्ण  केली. यासाठी  आदर पूनावाला यांच्या  सिरम इन्स्टिट्यूटने सीएसआर फंडातून  १.३२ कोटी रुपयांचा निधी  दिला आहे . या कामाचा शुभारंभ आज दि १ रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते  करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर होते . या कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका  उपायुक्त संदीप कदम , मोरगावचे सरपंच निलेश केदारी , माजी सरपंच पोपट तावरे , उपसरपंच संदीप नेवसे  ,अनिल ढोले , संजय तावरे , बारामती तालुका राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष शुभम तावरे ,  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष  अक्षय तावरे , अविनाश ढोले  व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते .                    मोरगावचे मुळ रहीवाशी असलेले पुणे महानगरपालिका उपायुक्त संदीप कदम यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे . मोरगाव परीसरातील ढोलेमळा , पाटील बुवाचामळा, चोपणवस्ती , तावरेवस्ती , हनुमाननगर, सोनारशेत येथील  दोनशे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे .तर येथील पाचशे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे . यामुळे परीसरातील  शेतकरी कुटुंबीयांचे जीवनमान उंचवणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत
To Top