सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील श्री कालभैरवनाथ वार्षिक यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत सार्थक सुर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकात ढाल आणि रोख ७१ हजार पारितोषिक पटकावले .
कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या लोणंद येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत सातारा जिल्ह्य़ातील तसेच पुणे सोलापूर अशा परजिल्हातील सुमारे ऐंशी पेक्षा अधिक बैलगाडा चालकांनी हिरीरीने भाग घेतला. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी लोणंद-निंबोडी रस्त्याला हजारो शौकिनांनी भर ऊन्हात हजेरी लावली.
भीर्रऽऽऽऽऽऽ करत भर ऊन्हात धुरळा उडवत अत्यंत चुरशीने चाललेल्या या शर्यती संध्याकाळी ऊशीरा पर्यंत सुरू होत्या. या शर्यतीत सार्थक सुर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक मिळवत ७१ हजाराचे पहीले बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांकावर राहीलेल्या साहेबराव शेळके यांना ५१ हजाराचे दूसरे बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांकांचे ३१ हजाराचे बक्षीस संतोष शिवतारे यांना मिळाले तर चौथ्या क्रमांकावर राहीलेल्या सुजित शेळके यांना २१ हजाराचे बक्षीस मिळाले तर पाचव्या क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस रामभाऊ केसकर आणि निखील ठोंबरे यांच्यात विभागून देण्यात आले.
या स्पर्धेचे समालोचन माजी सैनिक म्हस्कूआण्णा शेळके-पाटील आणि सचिन शेळके-पाटील यांनी केले तर स्पर्धेदरम्यान पंच म्हणून यात्रा कमिटीने काम पाहीले.
COMMENTS