बारामती दि १
बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समस्त भोसले व जगताप परिवाराच्या वतीने तसेच ग्रामस्थ मंडळ वाणेवाडी यांच्या वतीने वाणेवाडी गावातील मुस्लिम बांधवांसाठी दि ३० इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शफिकभाई मुलानी यांनी प्रास्ताविक केले तसेच शब्बीर आतार यांनी वाणेवाडी गावाने आम्हा मुस्लीम कुटुंबियांच्या वरती केलेल्या प्रेमाखातर गौरव उदगार काढले. मुस्लिम बांधवांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये वाणेवाडी गाव सतत अग्रेसर असते.
यावेळी समस्त ग्रामस्थ वाणेवाडी यांच्या वतीने सुनील भोसले यांनी रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर असाच एकोपा हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये राहावा असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पोपटराव भोसले, बाबासाहेब भोसले, किशोर भोसले, विक्रम भोसले, दिग्विजय जगताप, डॉक्टर प्रदीप भोसले, डॉक्टर विलास काटकर, श्री. अशोक भोसले, अख्तर शिकीलकर , सुमित भोसले, किशोर शेळके तसेच समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.