सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात कारखाना स्थापनेपासूच्या इतिहासात आज पहिल्यांदाच १३ लाख मे टनाचे गाळप केले आहे.
गेल्यावर्षी सोमेश्वर कारखान्याने ११ लाख ३९ हजार मे टन उसाचे गाळप केले होते. आज कारखान्याने १३ लाख ९२८ मे टन उसाचे गाळप करताना जिल्ह्यात ११.७५ चा सर्वात जास्त साखर उतारा
राखत १५ लाख २२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि ३ रोजी सोमेश्वरने आपली स्वतःची २५०० मे टनाने गाळप क्षमता वाढवत कारखाना तब्बल प्रतिदिनी ८२०० मे टनाने चालवला. पूर्वीची ५००० मे टन व नवीन २५०० मे टनाने गाळप क्षमता वाढल्याने कारखान्याने इतिहासात प्रथमच १३ लाख मे टन गाळप केले आहे.