'सोमेश्वर'चा हंगाम अंतिम टप्प्यात...मात्र सुपे मोरगाव दरम्यानचा ओढयावरील पुल ठरतोय ऊस वाहतुकीस अडथळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ऊस हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोरगाव सुपे या भागातील ऊस जादा राहिला असून यासाठी संचालक मंडळ रात्रंदिवस धडपडत आहे. 
           मात्र मोरगाव सुपे रस्त्यावर रस्त्यावर शेरेचीवाडी या ठिकाणी ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असून पुलाच्या बाजूला टाकलेल्या मुरुमामुळे ऊस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी उसाचे भरलेले ट्रक्टर मुरूममध्ये रुतून बसत असल्याने ते बाहेर काढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागत आहे. याठिकाणी लवकर काम पूर्ण करावे अथवा ऊस वाहतुकीस वेगळ्या रस्त्याची सोय करावी अशी मागणी सभासद करत आहेत.
----------------
 चार दिवसात पट्टा पडणार------
सोमेश्वर कारखान्याने कारखाना स्थापनेपासून आज पहिल्यांदाच १३ लाख मे टनाचे गाळप केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजून सात हजार टनाच्या आसपास ऊस शिल्लक असुन येणाऱ्या चार दिवसात कारखाना बंद होण्याची चिन्हे आहेत. 

To Top