सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
राजगड सहकारी साखर कारखान्याचे राष्ट्रवादीचे उमेदवारी अर्ज अधिकारी यांच्यावर दबाव टाकुन चुकीच्या पध्दतीने बाद केले.सदरचे अर्ज पुन्हा ग्राह्य धरावे म्हणून प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपिल केले असुन त्याचा निकाल १२ मे रोजी लागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी पञकार परिषदेत सांगितले.
राजवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राजगड सह कारखान्याच्या उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर त्यावर अपिल करुन पञकार परिषद आयोजित केली होती.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे,प्रकाश तनपुरे,नितिन धारणे,राजु भोसले,मनोज निगडे उपस्थित होते. रणजित शिवतरे व चंद्रकांत बाठे माहिती देताना म्हणाले राजगड साखर कारखान्याचे अर्ज दबाव टाकुन चुकीच्या पध्दतीने बाद केले आहेत. ते पुन्हा ग्राह्य धरावे म्हणून प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अपिल केले आहे. त्याचा निकाल १२ मे रोजी लागणार आहे.राजगडचे ९ संचालक जिल्हा बँकेचे थकबाकीदार असुन त्यांच्या उमेदवारी अर्जा विरोधात उच्च न्यायालयात अपिल करणार आहे.कारखान्यात विरोधी पक्षातील शेतकऱ्यांचा ऊस घेतला जात नाही. शेअर भांडवल वाढवले जाते त्याची कल्पना सभासदांना दिली जात नाही.त्यामुळे विरोधी सभासद होत नाही अशी टिका यावेळी करण्यात आली.दरम्यान उसाला भाव कमी दिला जातो.राजगड कारखाना पुणे जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत माञ ताळेबंदात ते दाखवले जात नाही l.राजगडने जिल्हा बँक व राज्य सहकारी बँक यांचे थकबाकीदार नसल्याचा दाखला दयावा आम्ही अर्ज मागे घेऊ असे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी दिले .आमदार राज्य शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे निवडणुक अधिकारी दबावाखाली काम करीत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला .