सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे शिवशक्ती व्यायाम मंडळ यांच्या वतीने भव्य दिव्य एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणुन लोणंद चे पोलिस निरीक्षक विशाल वायकर तसेच शिवशक्ती मंडळाचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती दत्तात्रय चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्र लोणंद चे मुख्य शेळके, राजेश चव्हाण, अनिल चव्हाण, भैय्यासाहेब खाटपे, उत्तम आगवणे, संजय सोनवणे, दादा गायकवाड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा 10 वर्षा आतील गट, 15 वर्षा आतील गट आणि खुला गट असे आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे पार पाडण्यात आली. स्पर्धेत जवळपास 95 स्पर्धकांनी सहभाग घेतला. या प्रत्येक गटामध्ये प्रामुख्याने प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले. यामध्ये खुल्या गटात कोल्हापूर येथील श्रीराज भोसले या स्पर्धकाने प्रथम क्रमांक पटकावला तर 15 वर्षां आतील गटात अपूर्व शेखर देशमुख सातारा याने प्रथम क्रमांक घेतला तर छोट्या गटात कु काव्या निलेश डबाडे सातारा हि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
या कार्यक्रमासाठी पुणे, सातारा, जालना, नगर, कोल्हापूर ठाणे आसे विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे नियोजन पाहून स्पर्धकांचे पालक व नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन ॲड. पृथ्वीराज चव्हाण, स्वप्निल कांबळे, अन्वर शेख, धनंजय पवार, इरफान सय्यद, तनुजा शहा, भुषण रेड्डी, यांसह शिवशक्ती मंडळाच्या कार्यकर्ते यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन तनुजा शहा तर प्रास्ताविक ॲड पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.आभार धनंजय पवार मानले.