बारामती ! कोऱ्हाळे बुद्रुक येथील जिल्हा बँकेच्या स्थलांतरीत शाखेचे उद्घाटन का टाळले अजित पवारांनी ? स्वतः फित न कापता 'सोमेश्वर'चे अध्यक्ष यांच्या हातात का दिली कात्री?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक स्वभाव व कडक शिस्त व नियमांच्या पालनासाठी प्रसिद्ध आहेत. यायचं प्रत्यय कोऱ्हाळे बुद्रुक येथील पुणे जिल्हा बँकेच्या नवीन शाखा स्थलांतरावेळी आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटनाची फित  स्वतः न कापता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते कापली गेली. 
          उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी करडी शिस्त पळत असतात. कोऱ्हाळे बुद्रुक येथील पुणे जिल्हा बँकेची शाखा नवीन जागी स्थलांतरित झाली. हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडणार होता. मात्र उद्घाटन होण्याच्या आधी अजित पवारांना कळाले की सदर जागा एन ए म्हणजे (नॉन अग्रिकल्चरल) नाही. त्यामुळे अजित पवारांनी या नव्या जागेतील इमारतीचे उद्घाटन टाळले. त्यामुळे हे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, तिजोरीचे व एटीएम चे पूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्ष सुनील चांदोरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर पार पडलेल्या सभेत ही अजित पवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली व परत यापुढे काळजी घेण्याच्या सूचना बँकेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
To Top