सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात इंग्लिश कम्युनिकेशन व डिजिटल लिटरसी कोर्समधील सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर,  ता - बारामती येथील, 'सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामध्ये अनुदीप फाऊंडेशन, पुणे आणि ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल व इंग्लीश विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम राबवला गेला.

अनुदीप फाउंडेशन, पुणे यांच्या तर्फे इंग्लिश कम्युनिकेशन आणि डिजिटल लिटरसीचा ११५ तासांचा  कोर्स सचिन धरुर सर , सॉफ्ट स्किल ट्रेनर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला म्हणून विद्यार्थांचा गुणगौरव करण्यासाठी सदर कोर्सच्या प्रशस्तीपत्रकाच्या वितरणाचा कार्यक्रम शुक्रवारी दि.२०/०५/२०२२ रोजी सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देवून  गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास विभागाचे प्रमुख  प्रा. पिंगळे एस.जी. ,इंग्लीश विभागाच्या विभागप्रमुख आणि कार्यक्रमाच्या समन्वयक  सह.प्रा. मोरे पी. तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे समन्वयक सह.प्रा जगदाळे के.एम, विभागप्रमुख प्रा.धनंजय बनसोडे यांचे योगदान लाभले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.पुरुषोत्तमदादा जगताप,उपाध्यक्ष मा.श्री. आनंदकुमार होळकर, सचिव मा.श्री.भारत खोमणे यांनी सर्व शिबीरार्थींचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. मयुरी यादव यांनी केले व आभार सह.प्रा जगदाळे के.एम. यांनी मानले  तसेच महाविद्यालयाचा सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
To Top