सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : धनंजय गोरे
मुंबई सह सातारा जिल्हयाची अर्थवाहीनी असलेल्या दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियन यांच्यात कर्मचारी वर्गाच्या वेतनवाढीचा त्रैवार्षीक करार बँकेच्या मुख्यालयात संपन्न झाला.
गेल्या दोन वर्षांपासुन असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व्यवसाय, उद्योग यांचेवर विपरीत परिणाम झालेले असतांनाही दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेने भारतीय रिझर्व्ह बँक तसेच सहकार खात्याचे सर्व निकषांचे पालन करीत आपल्या पारंपारीक ग्राहक वर्गास
समाधानकारकरित्या सेवा सुविधा प्रदान करून व्यवसायामध्ये समाधानकराक प्रगती साधलेली असल्याने व बँक नफ्यात असल्याने गेली तीन वर्ष प्रलंबीत असलेला कर्मचारी वेतन वाढ करार करण्याबाबत उभयपक्षी मान्यता देण्यात आलेली होती.
या प्रसंगी को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईजमध्यवर्ती युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, बँकेचे मार्गदर्शक वंसतराव मानकुमरे , बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, उपाध्यक्ष, भानुदास जाधव,माजी अध्यक्ष व संचालक मंडळ सभागृह नेते विक्रम भिलारे इतर सर्व सन्माननिय संचालक, को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज मध्यवर्ती युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस
नरेंद्र सांवत युनियनचे इतर विभागीय पदाधिकारी, कर्मचारी प्रतिनिधी प्रविण शिंदे, अशोक चव्हाण, लोकल कमीटीचे संघटक सचिव महादेव वाडकर व इतर पदाधिकारी व सदस्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक तानाजी पवार, उपसरव्यवस्थापक गोंविद जाधव, सहाय्यक सरव्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बँकेने 31 मार्च, 2022 अखेर ₹1300 कोटी इतका संमिश्र व्यवसायाचा पल्ला गाठलेला असुन बँकेच्या एन पी ए कर्जाची समाधानकारक वसुली करण्यात आलेली आहे. गतवर्षांतील ₹ 5.78 कोटी इतक्या संचीत तोट्याची भरपाई करुन बँक नफ्यात असल्याने बँकेच्या ग्राहक वर्गाचा बँकेवरील विश्वास वृद्यींगत होत असल्याने त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष 2022-23 हे बँकेचे यशस्वी असे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने या वर्षात ₹ 1500 कोटी इतका संमिश्र व्यवसाय करण्याचे व्यवस्थापन मंडळाचे ध्येय्य असुन कर्मचारी वर्गास व्यवसाय वाढीकरीता प्रोत्साहीत करण्याचे हेतुने या वेतन वाढ कराराला विशेष महत्व असल्याचे मानले जात आहे.
बँक व्यवस्थापन व को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज मध्यवर्ती युनियन मुंबई यांच्यात बँकेतील सव्वा दोनशे कर्मचा-यांना सुमारे 1.10 कोटी रुपयाची वार्षिक वेतनवाढ देण्याबाबतबँक व्यवस्थापन आणि कर्मचारी युनियन या उभयतांमध्ये करार झाला आहे
बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ
श्रेणीनिहाय भरघोष वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे हा करार 3 वर्षासाठी असून तो एप्रिल 2019 पासून पुर्वलक्षी प्रभावाने अंमलात येणार आहे. वेतनवाढीच्या व्यतीरिक्त कर्मचा-यांच्या विविध भत्यांमध्येही समाधानकारकपणे वाढ करण्यात
आली आहे. त्यामुळे बँकेच्या कर्मचा-यामंध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी युनियनचे अध्यक्ष आंदराव आडसूळ यांनी बँकव्या प्रगतीमध्ये
बँकेचे संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा असून माझे व बँकेचे एक वेगळे नाते असल्याचे सांगताना त्यांनी बँकेचे संस्थापक दत्तात्रय कळंवे महाराज व भिलारे गरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला कर्मचा-यानी बँकींग क्षेत्रामध्ये दररोज होणारे बदल आत्मसात करून येणा-या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कर्मचा-यांची भरघोष वेतनवाढ होण्यासाठी संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. विक्रम भिलारे यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ झालेली असल्याने पगार वाढीमुळे बँकेवर पडलेला अतिरीक्त आर्थिक भार भरुन काढण्यासाठी सर्व कर्मचा-यांनी पुढील काळात कामात झोकुन देऊन संपुर्ण योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे आज रोजी बँक सुस्थितीत ठेवण्यासाठी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमुद केले. वसंतराव मानकुमरे, बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, बँकेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष व
संचालक आनंदराव सपकाळ, संचालक चंद्रकांत गावडे, अॅड शिवाजीराव मर्ढेकर, कर्मचारी प्रतिनिधि अशोक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर युनियनचे सयुक्त सरचिटणीस महादेव वाडकर यांनी प्रस्तावना केली व
व्यवस्थापक विलास दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या वेतन वाढ करार प्रसंगी नुकतीक बँकेच्या उपसरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक पदी बढती देण्यात आलेले गोविंद जाधव तसेच नामदेव बांदल, अनिल सणस व संजय सपकाळ यांचा कर्मचारी युनियन व व्यवस्थापनाच्या वतीने
सत्कार करण्यात आला.