बारामती ! १० वी १२ वी नंतर काय..? या विषयावर वाणेवाडी येथे करियर मार्गदर्शन मेळावा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नुकत्याच २०२२ मध्ये पार पडलेल्या १० वी १२ वी बोर्ड परीक्षेनंतर विध्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आपल्या पाल्याला कोणत्या साईड पाठवणार या विचारत असताना मुलांच्या व पालकांच्या मनात असणाऱ्या करियर च्या प्रश्नाची उत्तरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना भेटली.                कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते विक्रम बोन्द्रे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच गणेश सावंत यांनी मुलांना करियर च्या दिशा व १० वी १२ वी नंतर काय या वर करियर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक Revolution सायन्स अकॅडमी चे संचालक बारवकर सर यांनी मुलांना १० वी नंतर सुरु करत असलेले इन्टीग्रॅटेड कोर्स व सायन्स क्षेत्रातील करियर संधी या वर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक प्रतिनिधी अशोक जाधव हे होते. उपस्थित मान्यवरामध्ये गणेश भोसले, गर्जे, अंकुश डोंबाळे, कर्चे, बुनगे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार श्रीकांत पाटील यांनी केले.
To Top