सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
गेल्या तीन दिवसांच्या पासून शहीद प्रथमेश पवार याच्या पार्थिवा कड़े डोळे लावून बसलेल्या जावली कराना आज त्यांचे दर्शन झाले, महामार्गा लगत पाचवड येथे पार्थिव आल्या नंतर सजविलेल्या गाड़ी मधून त्याची अंत्य यात्रा सुरु झाली,पाचवड पासून सरताळे, कुडाळ शेते, सोमर्डी बामणोली या गावात त्यांचे अंत्य दर्शन घेण्याकरीता हजारो लोक उपस्थित होते, त्याचे मूळ गांव बामणोली(डेरेवाड़ी) येथील घरी पार्थिव दाखल होताच घरातील सर्वानी आक्रोश केला,यावेळी त्याचे वडील संजय पवार,भाऊ आदित्य पवार व आई यांना अश्रु अनावर झाले.
बामणोली ग्रामस्थ यांनी दत्त मंदिरा लगत असणाऱ्या मोकळया जागेत अंत्य विधी ची चोख व्यवस्था केली होती,यावेळी जावली तालुक्या सह जिल्ह्यातून हजारो जनसमुदाय प्रथमेश पवार याना निरोप देण्यासाठी उपस्थित होता,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, दिपक पवार,पंचायत समिति सभापती जयश्री गिरी,तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी रमेश काळे, पोलिस उपअधीक्षक जानव्ही खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने जयदीप शिंदे, विलासबाबा जवळ, जयहिंद फॉउंडेशनचे पदाधिकारी,आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानवंदना दिल्या नंतर भाऊ आदित्य पवार याने प्रथमेश पवार याच्या पार्थिवास मुखाग्नि दिला.
अंत्य यात्रा व अंत्य विधि प्रसंगी भारत माता की जय,प्रथमेश पवार अमर रहे,वंदे मातरम, इंकलाब जिंदाबाद,वीर जवान तुझे सलाम या घोषणानी परिसर दुमदुमन गेला होता.यावेळी भारतीय सेना दलाचे जवान यांची उपस्थिति होती तसेच एन सी सी कैडेट,अनेक सामाजिक संघटना यांनी अंत्य विधि च्या करीता आपले योगदान दिले,येणाऱ्या जनसमुदाय करीता ग्रामस्थानी जागो जागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.