फलटण ! रस्त्यात बंद पडलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीचा धडक : एक जण ठार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
फलटण : प्रतिनिधी
सातारा - फलटण रोडवर आळजापूर येथे उभ्या असलेल्या 
ट्रकला दुचाकीची धडक दुचाकीस्वार झाला ठार झाला आहे. 
       लोणंद पोलीसांनी सांगितले की, सातारा - फलटण रोडवरील आळजापूर-कापशी येथील बस थांबा या मुख्य चौकात  ट्रक क्रमांक N L 01 AE-8348 हा ट्रक सातारा बाजूकडे जात असताना शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर बंद पडल्याने रस्त्यावरच उभा होता.आज रविवार दि.22 रोजी दुपारी 1.30 चे सुमारास  शहाजी मल्हारी मिसाळ वय 50 रा. आदकी बु ॥ ता. फलटण हे  दुचाकी क्रमांक  MH 11 C- 9015 आदर्किकडे जात असताना समोरून वाहन आल्याने येणारे वाहन पाहून दुचाकीचा वेग नियंत्रण करत असताना ट्रकवर जोरात आदळल्याने गंभीर जखमी होऊन मयत झाले. या बाबतची फिर्याद हणमंत काकडे रा. आदकी बु यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे.पुढील तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर , पीएसआय गणेश माने करीत आहेत.
To Top