भोर प्रतिनिधी
राजगड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून काँग्रेस पक्षाच्या वतीने राजगड सहकार पॅनलकडून श्री क्षेत्र बनेश्वर ता.भोर येथील महादेव मंदिरात भोर .वेल्हा.मुळशीचे आमदार संग्राम थोपटे व निवडणूक रिंगणातील उमेदवार यांच्या हस्ते शिवअभिषेक करून प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि.21 करण्यात आला.
सद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत 10 जागा बिनविरोध झाल्या असून 7 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक रविवार दि.29 पार पडणार असून मंगळवार दि.31 ला निकाल जाहीर होणार आहे.प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,बाजार समिती सभापती अंकुश खंडाळे, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष उत्तम थोपटे, माजी संचालक के.डी.सोनवणे, शिवनाना कोंडे,चंद्रकांत सागळे,बाळासाहेब दळवी,आबा शेलार,सुधीर खोपडे,शिवाजी नाटंबे आदींसह काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो=प्रचाराचा शुभारंभ करतानाचा फोटो ई.मेल करून पाठवीत आहे.
संतोष म्हस्के