मोठी बातमी : जावली ! तालुक्यावर शोककळा : जवान प्रथमेश पवार यांना जम्मू कश्मीर येथे वीरमरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : धनंजय गोरे
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असणाऱ्या बामणोली तर्फ कुडाळ या गावातील जवान प्रथमेश संजय पवार यांना काल रात्रि जम्मू कश्मीरच्या सांबा भागातील सीमेवर देश सेवा बजावत असताना वीर मरण आले असून जावली तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
             जावली सारख्या दुर्गम भागातुन शिक्षण घेत देश सेवा करण्याचे स्वप्न बाळगलेल्या प्रथमेश पवार यांची नुकतीच काही महिन्याच्यापुर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाली होती,आपले प्रशिक्षण पूर्ण करून सीमेवर सुरक्षा देत असताना काल रात्री दहशतवादयांच्या सोबत झालेल्या चकमकी मधे त्याना वीर मरण आले असून उद्या पर्यन्त त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी येणार असल्याचे बामणोली ग्रामस्थानी सांगितले 
          वयाच्या २२व्या वर्षी वीर मरण आल्याने बामणोली गांव शोकाकुल झाले असून,त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे.
To Top