मुंबई प्रतिनिधी
केतकी चितळेने २०२० मध्ये अनुसुचित जाती जमातीच्या (SC/ST) व्यक्तींबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकील होती. तिच्या या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी २०२० मध्ये केतकी आणि सूजर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणातच केतकीला रबाळे पोलिसांनी अटक केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. केतकी चितळेला गुरुवारी रबाळे पोलिसांनी अटक केली. अनुसूचित जाती जमातीच्या वक्तींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकीविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रबाळे
पोलिसांनी केतकीला अटक केली आहे.