सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील जामा मस्जिद मध्ये ऋषी गायकवाड मित्रपरिवार व करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या वर्षी अक्षयतृतीया आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत या दोन्ही सणांमुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये मध्ये आनंदाचे वातावरण असते. एकमेकांना या पवित्र सणांच्या शुभेच्छा देऊन हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन यावेळी ग्रामस्थांनी दाखवले. "सध्याच्या द्वेषाच्या राजकारणाच्या मुळे समाजातील एकता व बंधूता नष्ट होऊ नये यासाठी आज पर्यंत गाव खेड्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आलेला हिंदू-मुस्लिम समाज असाच एक राहावा" अशा भावना यावेळी उपस्थित असणाऱ्या हिंदू मुस्लिम बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दीडशे किलो साखर चे वाटप करण्यात आले.