सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या उत्तरेकडील यसाजी कंक जलाशया शेजारील संगमनेर येथे एक थेंब माझ्या राजासाठी या धर्तीवर शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबीर भरवण्यात आले.रक्तदान शिबिरात ७४ जणांनी रक्तदान केले असून हा उपक्रम राबविल्याबद्दल स्वराज्य मित्र मंडळाच्या तरुणांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. रक्तदान शिबिर चाकण ब्लड बँक व स्वराज्य मित्र मंडळ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.या रक्तदान शिबिरात गावातील तरूण वर्ग व महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिरात एकूण ७४ पिशव्यांचे रक्त संकलन करण्यात आले. शिबिराच्या दरम्यान भोरचे माजी उपसभापती विक्रमदादा खुटवड यांनी भेट दिली. तर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी संगमनेर मधील स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.