सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई दौलतराव पिसाळ
शिरगावचा वेदांत चव्हाण या १५ वर्षीय तरुणाचा ओझर्डे ता वाई येथील सोनेश्वर येथे कृष्णा नदीत पोहत असताना डोहात बुडून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बुडुन मृत्यू झाल्याने शिरगाव ता.वाई गावावर शोककळा पसरली आहे . या घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले डिवायएसपी शितल खराडे जानवे भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी
तातडीने महाबळेश्वर ट्रॅकर्सच्या पथकाशी संपर्क साधून त्यांना वेदांतचा मृतदेह शोधुन काढण्या साठी विनंती केल्याने हे पथक दुपारी ३ वाजता दाखल झाले या पथकाने बोटीच्या
आणी पाण्यातील कॅमेरेच्या साह्याने या पथकाने मृतदेह शोध मोहीम तब्बल रात्री ७ वाजे पर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण अंधार पडल्याने हि शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली. या दुर्घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे .
या गंभीर घटनेची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी तातडीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पाहणी करुन पिएसआय एन.एस.मोरे हवलदार शिवाजी तोरडमल चालक बापु वाघ यांना घटना स्थळावर सकाळी १० वाजता पाठवले होते .हे पथक दिवस भर
घटना स्थळावर ऊपस्थित होते
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्यातील शिरगाव या गावाच्या गावाच्या ग्रामदैवताची वार्षिक यात्रा मे च्या दि.६ आणी ७ रोजी असल्याने या गावातील महिला लहान मुले पुरुष वयोवृद्धांनसह ग्रामस्थ चार चाकी दुचाकी वाहने घेऊन ओझर्डे ता वाई येथील सोनेश्वर मंदिराच्या लगतच असणार्या कृष्णा नदी पात्रातील सोनेश्वर येथील डोहात घरा घरातील वाकळा धुण्या साठी सकाळी ६ वाजता दाखल झाल्याने मोठी गर्दी झाली होती
त्यात वेदांत हा देखील आपल्या आई वडिलांन
सोबत आला होता सकाळी वाकळा धुवुन झाल्या वर त्या वाळत टाकल्यावर त्या ऊन्हाने
वाळे पर्यंत वेदांत आणी त्याच्या सहकारी मित्रांना पाण्यात पोहण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी डोहाचा आणी त्यातील खोली सह पाण्याचा अंदाज न घेताच ऊड्या टाकल्या आणी क्षणार्धात वेदांत हा दिसेनासा झाल्याने त्याच्या आईने हंबरडा फोडला तो पर्यंत वेदांत बुडाला.
वेदांतचा बुडुन मृत्यू झाल्याची माहिती ओझर्डे गावासह शिरगाव मध्ये वार्या सारखी पसरल्याने नागरीकांचा लोंढा घटना स्थळावर दाखल झाला आणी शिवसागरात बुडाला .या मध्ये शिरगावच्या महिला सरपंच निलम भोसले उपसरपंच दिपक शिंदे महिला पोलिस पाटील
सौ.उज्वला भोसले ओझर्डे गावचे सरपंच आनंदराव जाधव पोलिस पाटील मचिंद्र कोदे कडेगावचे पोलिस पाटील
अक्षय टिके मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड गावकामगार तलाठी संदीप फाजगे यांची प्रमुख उपस्थिती होती .
चौकट.....
महाबळेश्वर ट्रॅकर्सचे प्रमुख सुनिल भाटीया (बाबा)आशीष बिरामणे तेजस जावेद
रुषीकेस जाधव अमीत कोळी अनील लांगी अमीत झाडे जयवंत बिरामणे सचिन डोईहोडे
पुणे येथील विजय शिवतारे सहकारी गुलशन यादव यांनी पाणबुडीचा वापर करुन
या सर्वांनी तब्बल ५० तास पाण्यात राहुन आपल्या प्राणाची बाजी लावून प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर मृत देह शोध मोहीम यशस्वी करुन कृष्णा नदीच्या सोनेश्वर डोहातुन मृतदेह बाहेर काढुन दिल्याने या टिमचे वाईचे तहसीलदार रणजित भोसले डिवायएसपी शितल खराडे जानवे भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड तलाठी हाफसे कोतवाल महेश गुरव पत्रकार दौलतराव पिसाळ आणी ओझर्डे शिरगाव ग्रामस्थांन सह वाई तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे ..