सोमेश्वर रिपोर्टर टीम - - - -
भोर प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भोर येथे माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सदिच्छा भेट घेवून प्रकृतीची विचारपूस करीत राजकीय तसेच सामाजिक विषयांवर बराच वेळ चर्चा केली.या सदिच्छा भेटीमुळे भोरच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
भाजपाचे बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिले जाते.म्हणूनच ही भेट सदिच्छा की जेष्ठ थोपटे साहेबांचा कानमंत्र घेण्यासाठी होती अशी चर्चा रंगू लागली आहे.एकेकळी राज्यात काँग्रेसचे दिग्गज म्हणून ओळखले जाणारे व राज्य सरकार मधील अनुभवी मंत्री अनंतराव थोपटे व हर्षवर्धन पाटील होते.मात्र पाटील यांनी आघाडीच्या कुरगोडीमुळे काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये उडी मारली.मात्र निष्ठावंत व काँग्रेसचे कट्टर म्हणून आजही अनंतराव थोपटे यांच्याकडे पाहिले जाते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील..ठाकरे म्हणाल्या थोपटे साहेब यांनी तब्बल 15 वर्षे राज्याच्या मंत्री मंडळात अनुभवी मंत्री म्हणून काम पाहिले तर ते युवकांसाठी कायमच प्रेरणास्थान ठरले आहेत.