भोेर प्रतिनिधी
भोरला पाहुण्यांकडे आलेल्या पाच तरुणींचा भाटघर जलाशयात बुडून मृत्यू
नऱ्हे ता.भोर येथे भाटघर जलाशयात पाहुण्यकडे आलेल्या पाच तरूणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१९ सायंकाळी तीनच्या दरम्यान घडली असून पाच पैकी चार जणींचा शोध लागला असून रात्री उशिरापर्यंत एका तरूणींचा शोध लागला नाही.
जलाशयात बुडालेल्या मुलींमध्ये खुशबू लंकेश रजपूत वय १९ रा. बावधन, मनीषा लखन रजपूत वय २० ,चांदणी शक्ती रजपूत वय २१
पूनम संदीप रजपूत वय २२ तिघी राहणार संतोषनगर हडपसर पुणे तर मोनिका रोहित चव्हाण वय २३ रा नऱ्हे ता. भोर तर एका तरुणीचा मृतदेहाचा शोध सुरू आहे.आशा एकूण पाच तरुणीचा बुडून मृत्यू झालेला आहे.शोध घेण्यासाठी राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील तसेच नितीन खामगळ व सह्याद्री टीम यांचे शोध कार्य चालू आहे.