सोमेश्वर रिपोर्टर टीम
बारामती प्रतिनिधी
देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब तसेच प्रतिभाताई पवार यांनी आज सूपे याठिकाणी भेट देऊन सूपे याठिकाणी चालू असलेल्या विद्या प्रतिष्ठान काॅलेजच्या कामाला भेट देऊन चालू असलेल्या कामाची माहिती घेतली तसेच सर्व अड अडचणी जाणून घेतल्या यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शौकतभाई कोतवाल यांनी इंग्लिश मेडीअम स्कूल साठी मुले ने आण करण्यासाठी बसेस साठी परवानगी मिळावी अशी मागणी केली .
तसेच यावेळी जानाई योजनेवर चर्चा होऊन जानाई योजनेचे सध्या चालू असलेले आवर्तन वाढुन मिळावे अशी मागणी करण्यात आली यामध्ये निश्चित लक्ष घालू असं यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सांगितले यावेळी बोरकरवाडीचे उपसरपंच दत्तात्रय कदम, सुपे गावचे माजी उपसरपंच शफीक बागवान,पत्रकार सचिन पवार, राजकुमार लव्हे,सुरज शिंदे उपस्थित होते