सोमेश्वर रिपोर्टर टीम
पुरंदर प्रतिनिधी
परिंचे (ता.पुरंदर) येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुकीत परिवर्तन झाले असून दहा वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या सोसायटी वर राष्ट्रवादी व शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत श्री सिद्धिविनायक परिवर्तन पॅनलने १३ पैकी ९ जागा जिंकल्या असून दणदणीत विजय मिळवला आहे. कॉंग्रेस पुरस्कृत श्री काळभैरवनाथ सहकारी विकास पॅनलला ४ जागा जिंकल्या आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उर्मिला मदने, सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव शेवते यांनी काम पाहिले.परिंचे सोसायटीच्या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते.
पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव व शिवसेना नेते समीर जाधव यांनी युती करून श्री सिद्धिविनायक परिवर्तन पॅनलची स्थापना करून तेरा पैकी नऊ जागा जिंकल्या यामध्ये सुशीलकुमार रामराव जाधव, नंदकुमार विठ्ठलराव जाधव, महादेव भैरु दुधाळ, संजय मारूती होले,पुष्पा रतिकांत जाधव, रंजना बाळासाहेब जाधव, सुभाष पांडुरंग नवले,बबन पर्वती जाधव, वसंत भिकु नवले हे उमेदवार विजयी झाले. पुणे जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मयूर मुळीक व सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व कॉंग्रेस नेते निलेश जाधव यांनी कॉंग्रेस पुरस्कृत श्री काळभैरवनाथ सहकारी विकास पॅनलची स्थापना करून तेरा पैकी चार जागांवर विजय मिळवता आला यामध्ये निलेश रामदास जाधव,दिलिपसिंह अनंतराव जाधव,भरत भिकोबा वाघोले, कैलास प्रल्हाद पोळ यांची मतदानाद्वारे निवड करण्यात आली.
निवडून आलेल्या उमेदवारांचे माजी पंचायत समितीच्या सभापती व विद्यमान सदस्या अर्चना जाधव यांनी स्वागत केले.तरुण कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्याने हि निवडणूक जिंकली असल्याचे पुष्कराज जाधव यांनी सांगितले यावेळी उपसरपंच दत्तात्रय राऊत, उल्हासनाना जाधव, बाळासाहेब जाधव, डि.सी.जाधव , प्रविण जाधव,पराग जाधव, श्रीपाद गुरव, बाबासाहेब जाधव, काशिनाथ राऊत, दत्ता भोंगळे,किसन वाघोले, माजी सरपंच सोपान राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जाधव, सटलवाडी सरपंच सागर करवंदे आदी मान्यवर उपस्थित होते.