सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
ज्या विरोधक पुढाऱ्यांनी कधी स्वतः ऊस पिकविला नाही,कारखान्याला ऊस घातलेला नाही, राजगड कारखान्याचे सभासद नाहीत आशांनी कारखाना सभासद, शेतकरी ,कर्मचारी यांच्या प्रती खोटा कळवळा आणू नये. सामोरी घातलेली कारखान्याची निवडणुक लोकशाहीच्या मार्गाने पार पडणार आहे.शेतकरी व सभासद यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याने येणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी गुरुवार दि.12 झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार पुढे म्हणाले विरोधक शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करुन व्यक्तीव्देष म्हणून जर राजगड कारखान्याची निवडणूकीचे कारण पुढे करुन आरोप करीत असतील तर ते खोटे असून त्यांना सहकार क्षेञातील अनुभव कमी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.30 वर्षापासून कारखान्याचे संचालक मंडळ हे शेतकरी ,सभासद यांना विश्वासात घेऊन उत्तम पध्दतीने काम चालवत आहे. विरोधकांना निवडणूकीमध्ये १७ जागेसाठी योग्य उमेदवार देता आले नाही.तर जे उमेदवार दिले त्यांचे कागद पञे अपूर्ण असल्यामुळे अर्ज बाद झाले आहेत.यावेळी राजगड कारखान्याचे संचालक के. डी.सोनवणे , दिनकर धरपाळे , विकास कोंडे , शिवाजी कोंडे , विठ्ठल आवाळे , रोहन बाठे , दत्ताञय चव्हाण , संतोष सोंडकर , सुरेखा निगडे , विठ्ठल कुडले आदी उपस्थित होते.
चौकट=राज्यात महाआघाडी मात्र भोर तालुक्यात महाआघाडीत बिघाडी
राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना असे तीन पक्षांचे महाआघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत आहे.मात्र भोर तालुक्यात महाआघाडीतील काही पक्ष निती मूल्यांना विसरून राजगड कारखाना निवडणुकीत भाजप बरोबर युती करून महाआघाडीत बिघाडी घडवून आणण्याचे काम करीत आहेत ही कसली विचारधारा असा प्रश्न तालुक्यातील सुज्ञ जनतेला पडला आहे.