'सोमेश्वर'च्या अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सभासदांना आर्थिक भुर्दंड : ऊस जळीताचे तात्काळ टनाचे ८०० रुपये परत करावेत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ सालातील उस गाळप हंगाम अंतिम टप्यामध्ये आलेला आहे. कारखान्याने नुकतेच १३ लाख मे.टन उस गाळप पुर्ण केलेले आहे. परंतु कारखान्याचा गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत लांबल्याने व चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सभासदांना आर्थिक भुदंड सोसावा लागलेला आहे. असा आरोप शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी केला आहे. 
        काकडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कारखान्याचे चेअरमन वारंवार वर्तमान पत्राच्या माध्यमातुन व कारखाना निवडणुकी दरम्यान सांगत होते की कारखान्याची विस्तारवाढ डिसेंबर अखेर पुर्ण होणार आहे व १५ जानेवारी पासुन कारखाना ९ हजार मे. टनाने चालेल. तसेच ज्या सभासदांच्या उसाच्या नोंदी झाल्या नाहीत त्यांच्याही नोंदी घेण्यात येतील व सभासदांच्या सर्व उसाचे गाळप केले जाईल परंतु चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या चुकीच्या (शुन्य) नियोजनामुळे कारखान्याची विस्तावाढ होण्यास उशीर झाला त्याचा परिणाम सभासदांची उस तोड उशीरा होण्यावर झाला. परिणामी काही सभासदांना तर उस पेटवुन गाळपास आणावा लागला त्यामुळे कारण नसताना त्यांच्या उसबिलातुन ८०० रू प्र.मे. टन कपात करण्यात आली. तसेच सभासदांच्या तोडी लांबल्याने उस वजनामध्ये १० ते १५ टनांची घट झाली, त्याचप्रमाणे उस तोडीसाठी एप्रिल व मे महिना उजाडल्याने उस तोडणी मजुरांनी सभासदांकडुन उस तोडणीसाठी एकरी ५ हजार ते २५ हजार रू. घेवुन मोठया प्रमाणात उस पेटवुन कारखान्यास पाठवला त्यामुळे सभासदांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यांची संपुर्ण जबाबदारी चेअरमन व M.D यांनी स्विकारून जाहीर माफी मागावी. व शेवटच्या २ महिन्यात ज्या सभासदांचा उस जाळुन आणलेला आहे. त्या सभासदांना चेअरमन व M.D यांनी स्वतःच्या खिशातुन नुकसान भरपाई व कापत केलेले ८०० रू प्र. मेटन तात्काळ सभासदांच्या खात्यावर वर्ग करावेत कारण याची संपुर्ण जबाबदारी चेअरमन व M.D यांची आहे कारण आता कारखान्यातील बरेचशे संचालक नवीन आहेत यात त्यांची काही चुक नाही.
         चेअरमन यांची कार्यपध्दती ही कारखान्याला मागील दिवस पुढे आणल्याचे दिसते कारण कारखान्यास उस जास्त आहे गाळप झाले पाहिजे असे वारंवार सांगुन सभासदांना त्यांच्या उसाची विल्हेवाट लावावी लागेल असे चेअरमन म्हणाले होते. तेच चेअरमन आता सभासदांना अवाहन करीत आहेत की उस बाहेर देवु नका सभासदांच्या संपुर्ण उसाचे गाळप करणार म्हणजे चेअरमन व M.D यांचा ताळमेळच नसल्याचे यावरून दिसते. सभासदांच्या उसाची जबाबदारी चेअरमन या नात्याने स्विकार करायला नको का? उस जास्त आहे हे माहित असताना सभासदांच्या उसाचे करार बाहेरील कारखान्यां बरोबर का केले नाहीत? जर चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी सभासदांच्या उसाचे नियोजन योग्य रितीने करून बाहेरील कारखान्यांबरोबर योग्य पध्दतीने करार केले असते, कारखान्याची विस्तावाढ लवकरात लवकर कशा पध्दतीने पुर्ण होईल याकडे लक्ष दिले असते तर आज सभासदांना उस जाळुन, उस वजनामध्ये १० ते १५ टनांची घट होवुन व उस तोडणी कामगारांना हजारो रूपये तोडणीसाठी देण्याची वेळच आली नसती. हे तुमचे अपयश नाही का? तरी आत्ता सभासदांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोणाची आहे? याचे उत्तर चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी यावे
           तसेच कारखान्याने सन २०१७-१८ साली भविष्यात साखरेचे भाव कमी झाल्यास सभासदांना अंतिम उस दर, जादा उस दर तसेच FRP देण्यासाठी रक्कम कमी पडल्यास वापरता यावी यासाठी आर्थिक पत्रकामध्ये किंमत चढउतार निधी सुमारे २० कोटी रूपये तरतुद करून ठेवली होती. परंतु चेअरमन यांनी कोरोना महामारीचे संपुर्ण निबंध शिथील झालेले असतानाही विशेष सर्व साधारण ऑफलाईन (नेहमीसारखी) न घेता ऑनलाईन घेवून किंमत चढउतार निधी विस्तारीकरणासाठी वर्ग केला. कारखाना कार्यस्थळावर सर्व सभासद बोलावुन सभा घेतली असती तर बहुतांश सभासदांनी यास प्रखर विरोध केला असता हे चेअरमन यांनी ओळखले म्हणुनच ऑनलाईन सभा घेवुन किंमत चढउतार निधी विस्तारीकरणास वर्ग केला.
       वास्तविक अंतिम भाव सभासदांना देवुन कारखान्याकडे राहणारा शिल्लक नफा, घसारा रक्कम व शेअर्स भाग भांडवल, नफा-तोटा पत्रकामध्ये केलेल्या तरतुदी यातुन मिळणाच्या उत्पन्नातुन मागील तीन ते चार वर्षांमध्ये विस्तारीकरणासाठी तरतुद करणे आवश्यक असताना शिल्लक असलेले कोट्यावधी रूपये गेले कोठे? वास्तविक कारखान्याच्या चेअरमन यांनी कारखान्याची विस्तारवाढ करावयाची आहे हे डोळ्यासमोर ठेवून मागील ४ वर्षापासुन याचे नियोजन करावयास हवे होते. परंतु वैयक्तिक लाभ डोळ्यासमोर ठेवून मागील शिल्लक उत्पन्नातुन इमारतींची बांधकामे करणे, वॉल कम्पाउंड बांधणे, अनावश्यक कामे, अनावश्यक खरेदी इत्यादींसाठी खर्च केली नसती तर आज कारखान्यास सभासदांच्या हक्काचे किंमत चढउतार निधीचे २० कोटी व सभासदांच्या ठेवीचे २४ कोटी असे ४४ कोटी रूपये कारखान्याच्या विस्तारवाढीस घेण्याची नामुष्की आलीच नसती. तसेच विस्तारीकरण वेळेत होण्यास उशीर झाला याचे मुख्य कारण कारखान्याकडे पैसेच उपलब्ध नसल्याने कॉन्ट्रॅक्टरला वेळेत पैसे देता आले नाहीत त्यामुळे विस्तारीकरण लांबले हे सभासदाना आपण का सांगत नाही? हे तुमचे अपयश नाही का?
          तरी यापुढे चेअरमन यांनी कारखान्याबाबतीत कुठल्याही गोष्टी पेपरमधुन खोटया देवु नये अशी कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. तरी सभासदांच्या जळीत झालेल्या उस बिलातुन कपात केलेले ८००/- रू.प्र. मे. टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या बतीने कारखान्यास करण्यात येत आहे.
--------------------
चेअरमन व M.D यांनी अलीकडील ३ महिन्यात सभासदांच्या जादा उसाबाबत उसतोडणी बाबत, वाहतुकीबाबत सभासदांच्या मिटींग घेवुन याबाबत काही उपाय योजना केल्या का? याचे उत्तर चेअरमन यांनी द्यावे. फक्त संचालकांना गटात पाठवुन काय उपयोग? याचे पुर्ण अधिकार अपणास व M.D यांना आहेत हे आपण विसरलात की काय? तुम्हाला सभासदांसाठी वेळ कोठे होता कारण तुम्ही तर कारखाना भागातील ग्रामपंचायती निवडणुका, सोसायटया निवडणुका यामध्ये व्यस्त होता या निवडणुकीत जाणिवपुर्वक लक्ष घालून प्रत्येक गावात दुफळी निर्माण केली. तसेच कारखान्याचे चेअरमन झाल्यावर फक्त स्वतःची मिरवणुक मुरूम व निंबुत गावात काढली मग त्या दोन गावातील संचालकांना मिरवणुकीत का सामिल करून घेतले नाही? का ते संचालक विरोधी पॅनल मधुन निवडुन आले होते. याचा खुलासा चेअरमन यांनी करावा.
To Top