सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड दि.१३ (वार्ताहर)
संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज पत्रकार रत्न पुरस्कार भिवरी गावचे सुपुत्र, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, दै. लोकमतचे पत्रकार, हॉटेल लोणकर वाड्याचे मालक, समाजसेवक सुनील पांडुरंग लोणकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवडीचे पत्र पुरंदर तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संदीप बनकर यांनी सासवड येथे सुनील लोणकर यांना दिले .
यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक दशरथ यादव,समाजसेवक, अध्यात्मिक व्यक्तिमत्व नंदकुमार दिवसे,भुलेश्वर दौलतमंगळ दुर्ग ट्रस्टचे विश्वस्त शरद यादव उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार वितरण सोहळा माळशिरस (ता. पुरंदर) येथे 14 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वा. होणार आहे.
COMMENTS