सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई ! प्रतिनिधी
किसन वीर सातारा साखर कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड करण्यासाठी आज मंगळवारी (दि 17) सकाळी साडेअकरा वाजता नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था सातारा मनोहर माळी यांनी बोलावली आहे.
कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी संचालकांची मते जाणून घेण्यासाठी काल सातारा जिल्हा बँकेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार मकरंद पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,प्रमोद शिंदे,शशिकांत पिसाळ आदी सर्व संचालक उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार रामराजे नाईक निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांना संचालक मंडळाने दिले आहेत. ते दोघे घेतील तो निर्णय मान्य असेल असे सांगण्यात आले आहे. आज निवड किसन वीर नगर येथे होणार आहे