बारामती ! सोमेश्वरनगर येथे जनतेच्या सुटणार समस्या : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय व सभासद नोंदणी शुभारंभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनागर : प्रतिनिधी
करंजेपुल (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सोमेश्वरचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणी कार्यक्रमात सुमारे ३३१ सदस्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती ऋषीकेश गायकवाड यांनी दिली. सोमेश्वरनगर,  मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी,  करंजेपुल परीसरातील युवक व नागरीकांनी यात सहभाग घेत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. तृतीयपंथी संतोष मेमाणे यांनीही यावेळी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, सुनिल भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, अभिजीत काकडे, सरपंच वैभव गायकवाड, विजयकुमार सोरटे, दिग्विजय जगताप, रमाकांत गायकवाड, कैलास मगर, विक्रम भोसले, गौतम काकडे, ॲड. नवनाथ भोसले यांच्यासह ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. ऋषीकेश गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
To Top