सोमेश्वर रिपोर्टर टिम- - -
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणीच्या कार्यक्रमा अंतर्गत उद्या दि १६ मे ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती तालुका यांच्या मदतीने क्रियाशील व प्राथमिक सभासद नोंदणीचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय करंजेपुल, सोमेश्वरनगर या ठिकाणी पार पडणार आहे.
या सभासद नोंदणी कार्यक्रमा मधे सर्वांनी उपस्थित राहून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत सभासद नोंदणी करून पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मदत करावी असे अव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करंजेपुल,सोमेश्वरनगर यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करंजेपुल,सोमेश्वरनगर व ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.